राजकीय महाभूकंप… महाविकास आघाडीतून ‘हा’ पक्ष बाहेर पडला

Mahavikas Aaghadi l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे, तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. अशातच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. मात्र आजपासून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरु आहे. मात्र या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

‘या’ पक्षाने माविआची साथ सोडली :

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीतील मित्र पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीने आता महाविकास आघाडीची साथ सोडली आहे.

यासंदर्भात शिवाजीनगर- मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे आमदार अबू असीम आझमी यांनी घोषणा केली आहे. याशिवाय यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव का झाला? यावर देखील अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mahavikas Aaghadi l अबु आझमी नेमकं काय म्हणाले? :

विधानसभा निवडणूक लढवताना महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. कारण कोणत्याही निवडणुकीला सामोरं जात असताना एकवाक्यता ही गरजेची आहे. तसेच त्यावेळी कोणत्याही पक्षाचा नेता निवडणूक लढत असेल तर त्याला आपला नेता- उमेदवार म्हणून समजलं गेलं पाहिजे. परंतु यावेळी महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता असं आमदार अबू आझमी म्हणाले आहेत.

तसेच या विधानसभेत महाविकास आघाडी पराभूत का झाली? यावर देखील आझमी यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या उमेदवारांच्या मंचावर प्रचारासाठी दिसले नाहीत. या कारणामुळेच महाविकास आघाडीचा पराभव झाला असल्याचं अबू आझमी यांनी सांगितलं आहे.

News Title – Samajwadi Party Exit From Mahavikas Aghadi

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून मविआच्या आमदारांनी शपथ घेतली नाही, आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

भाजपचा आमदार बसला विरोधी बाकावर, पुढे काय घडलं?

बापरे! …असं न केल्यास शाळांवर होणार मोठी कारवाई

थर्टी फर्स्ट डिसेंबर साजरा करण्यापूर्वी ही बातमी वाचाच!

राज्यावर पावसाचं सावट; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट