बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाच गाणे करणाऱ्या महिला वेश्याच असतात; खासदाराचे बेताल वक्तव्य

नवी दिल्ली |  अभिनेत्री झायरा वसिम हिच्या बॉलिवूड निवृत्तीचं समर्थन करत नाच गाणे करणाऱ्या महिला वेश्याच असतात, असं संतापजनक वक्तव्य समाजवादी पार्टीचे खासदार एस. टी. हसन यांनी केलं आहे.

इस्लामच नाही तर कुठल्याही धर्मामध्ये महिलांच्या अंगप्रदर्शनाला परवानगी नाही. त्यातही कामोत्तेजना वाढवणाऱ्या अवयवांचे प्रदर्शन करणे इस्लाममध्ये हराम आहे, असं ते म्हणाले.

झायराच्या बॉलिवूड एक्सिटबद्दल एस. टी. हसन यांना एका वृत्तवाहिनेने प्रश्न विचारला होता. जर कपड्यांमधून शरीरप्रदर्शन होणार आहे तर मग झायराने योग्य निर्णय घेतला आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, एस. टी. हसन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका करत त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘मुंबई तुंबली आम्ही नाय पाहिली’; शिवसेनेच्या महापौरांचा अजब दावा

-झायरा वसीमचा निर्णय अन् अबू आझमी आणि शिवसेनेतच भांडणं…!

मोहन भागवत झाले डिजीटल; भागवतांनी केली ट्विटरवर एन्ट्री

-भारतीय संघाला धक्का; दुखापतीमुळे हा अष्टपैलू खेळाडू विश्वचषकातून बाहेर

-पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना मोठा धक्का; वंचितकडून ‘हा’ नेता निवडणुकीच्या रिंगणात!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More