Top News देश

सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून पण…., सामनातून टीकेचे बाण

नवी दिल्ली  | राजस्थानात गेहलोत-पायलट यांच्यातला सत्तासंघर्ष टोकाला पोहचला आहे. यातूनच गेल्या तीन दिवसांपासून तिथे नाट्यमय घडामोडी घडत आहे. यावरूनच आजच्या सामनातून भाजपला लक्ष्य करण्यात आलं आहे. राजस्थानातलं काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून होत असल्याचं गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे.

आजच्या अग्रलेखात म्हटलंय, “जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष उघडपणे पुढे येऊन काही करणार नाही. यासाठी भारतीय जनता पक्ष उघडपणे काहीच करीत नसून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून चालले आहे”

“विरोधकांची सरकारे अस्थिर करायची या सूत्राने केंद्रीय सत्ता काम करीत आहे. देशापुढे कोरोनाने कोसळलेली अर्थव्यवस्था, लडाखमधील चिनी घुसखोरी असे अनेक प्रश्न आहेत. लडाख सीमेवरील आपल्या 20 सैनिकांचे सांडलेले रक्त अजून ताजे आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे राहिले बाजूला, काँगेसच्या अंतर्गत भांडणात टांग टाकून घोडेबाजारास उत्तेजन देण्याचे काम राजस्थानात सुरू आहे.”

“वाळवंटात राजकीय उपद्व्याप करून वादळ निर्माण करून भाजप काय साध्य करणार आहे? अशाने संसदीय लोकशाहीचे वाळवंट होईल. भाजपकडे देशाची संपूर्ण सत्ता आहे. काही घरे त्यांनी विरोधकांसाठी सोडायला हवीत. यातच लोकशाहीची शान आहे!”

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

आयसीसच्या संपर्कात असलेल्या तरुणीचं बारामती कनेक्शन; पुण्यातून अटक

महत्त्वाच्या बातम्या-

“पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱ्या उंदराप्रमाणे पायलट यांनी वागू नये”

“दिल्लीच्या राजकारणात अमित शहा देखील नवे… आम्ही म्हटलं, का नया है वह”

सोलापूर जिल्हा कारागृहात कोरोनाचा झाला होता उद्रेक, साखळी तोडण्यात प्रशासनाला यश!

प्लाझ्मा थेरपीसंदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या