Top News महाराष्ट्र मुंबई

“कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ औवेसी”

मुंबई | औवेसी यांनी बिहारमध्ये भाजपची मदत केली. आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातही तसंच होईल, असं वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केलं होतं. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजप नेतृत्वासह असदुद्दीन औवेसी यांच्यावर निशाणा साधला आहे.

कमळाच्या फुलातील कुंजबिहारी हे अटलबिहारी वाजपेयी, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी, आडवाणी, मोदी, अमित शहा असावेत या भ्रमातून साक्षी महाराजांनी लोकांना बाहेर काढून कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ औवेसी आहेत हेच दाखवलं आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मुसलमानांची मते ‘सेक्युलर’छाप राजद, समाजवादी पार्टी किंवा काँग्रेसकडे जाऊ नयेत, त्यांना ही हुकमी मते मिळू नयेत यासाठी मियाँ ओवेसी यांचा पद्धतशीर वापर केला जात असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, भाजप इतरांना नैतिकतेचे आणि हिंदुत्वाचे धडे देत असतो. आमचेच राष्ट्रीयत्व किंवा हिंदुत्व कसे शुद्ध बनावटीचे असा त्यांचा दावा असतो. त्या शुद्ध हिंदुत्वात औवेसीच्या उंगल्याही बुडत असतात, असा टणत्कार साक्षी महाराजांनी केला असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध अभिनेत्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप

“पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

लसीवर कोविड योद्ध्यांचा पहिला हक्क- पंतप्रधान नरेंद्र मोदी

“भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरवल्याशिवाय राहणार नाही”

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेनी केली मुख्यमंत्र्यांकडं ‘ही’ मागणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या