मुंबई | महाराष्ट्रात सीबीआय, ईडी वगैरेतून निर्माण झालेला सूडाचा विषाणू ठाकरे सरकारने मारला तसा कोरोनाचा विषाणू मारला जाईल. तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा मास्क तोंडाला बोळा म्हणून वापरावा हे बरे, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
राज्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी देवेंद्र फडणवीस यांची गरज असल्याचं राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपवासी झालेले निरंजन डावखरे यांनी म्हटलं होतं. यावरून शिवसेनेनं आता भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपचे भाडोत्री बगलबच्चे मानवतेचे शत्रू आहेत. ही वेळ एकमेकांवर दोषारोप करण्याची, राजकीय कुरघोड्या करण्याची नसून एकमेकांना सहकार्य करून ‘कोरोना’ नावाच्या महामारीपासून महाराष्ट्राला व देशाला वाचवण्याची असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, संपुर्ण देशासह आपला महाराष्ट्र कोरोना व्हायरसशी एक युद्ध लढत आहे. जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या विषाणूशी इतका मोठा लढा महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नसल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी लोकल आणि एक्सप्रेस बंद राहणार का? रेल्वेनं दिलं स्पष्टीकरण
घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी द्या; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
महत्वाच्या बातम्या-
“उद्धव ठाकरेंनी एक वडील म्हणून जनतेची काळजी घेतली, त्यांचं काम इतिहासात नोंदवलं जाईल”
अमेरिका ते मुंबई थरारक अनुभव, अमेय वाघच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का
“…म्हणून फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं आणि कायम बसावं लागेल”
Comments are closed.