Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र हा देशाचा आर्थिक कणा; हा कणा मोडू नका हेच पवारांनी केंद्राला सांगितलंय- संजय राऊत

मुंबई | कोरोनाने अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे राज्यांचा महसूल बंद आहे. यामुळे राज्याचा खूप मोठ्या प्रमाणावर महसूली तोटा होणार आहे. हीच अर्थनिती आणि केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना असलेल्या अपेक्षा शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मांडल्या आहेत.

प्रत्येक राज्याचे स्वत:चे अर्थशास्त्र आहे. ते मजबूत करणे ही जबाबदारी पंतप्रधान म्हणून मोदी यांची आहे. राज्यांना मोडकळीस आणणे म्हणजे देश मोडण्यासारखे आहे. महाराष्ट्रासारखे राज्य तर देशाचा आर्थिक कणाच आहे. हा कणा मोडू नका. पवारांनी तेच सांगितले आहे, असं संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना महाराष्ट्राची सध्याची आर्थिक स्थिती पत्र लिहून कळवली आहे. याचविषयी राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून दीर्घ भाष्य केलं आहे.

प्रत्येकाने आता स्वावलंबी झालं पाहिजे हे आपल्याला कोरोनाने शिकवले हे पंतप्रधान मोदींचं मत खरं आहे. पण यापुढे राज्यांना स्वावलंबी राहणे कठीण आहे व त्यांना केंद्राच्या मेहेरबानीवरच अवलंबून राहावे लागेल, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासारखे संपन्न राज्य केंद्राच्या तिजोरीत मोठी रक्कम भरत असते. मुंबईतून साधारण सव्वा दोन लाख कोटींचा महसूल केंद्राला मिळत असतो, पण लॉक डाऊनमुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसून महसुलात 1 लाख 40 हजार कोटींची तूट येईल व त्यामुळे राज्याचा डोलारा चालविणे कठीण होईल, असं पवारांना वाटते. पवारांनी पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या स्थितीबाबत स्पष्ट कल्पना दिली आहे. केंद्राने महाराष्ट्राला आर्थिक पॅकेज द्यावे, अशी पवार यांची मागणी आहे व सद्यस्थितीत ती योग्यच आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

पवारांनी महाराष्ट्राबरोबरच इतर सर्वच राज्यांना केंद्राने मदत करावी असे सुचवले आहे. आजमितीस शरद पवारांइतका राज्य चालविण्याचा अनुभव असलेला दुसरा नेता देशात नाही. अर्थविषयक विचार मांडणारे मनमोहन सिंग आहेत. ते बोलत असतात, पण शरद पवार यांच्या सांगण्यातले वजन आज महत्त्वाचे आहे, असंही त्यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पोलिसांनी वारंवार सांगूनही ऐकलं नाही; ‘या’ कारणामुळे पुणे पोलिसांनी पकडले ६९९ जण

“लॉकडाऊन संपण्याची चिन्हं नाहीत, हे प्रकरण मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाणार”

महत्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांच्या बांधावर बी-बियाणे आणि खतं पोहचवा; कृषीमंत्र्यांचे आदेश

आजपासून आणखी 5 ठिकाणी कोरोना निदान प्रयोगशाळा

राज्य सरकारचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या