मुंबई | औरंगाबादच्या नामंतराचा मुद्दा आणखी पेटत चालला आहे. विरोधी भाजप पक्ष तर नामंतराची मागणी करतच आहे पण इकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष यावरून एकमेकांविरूद्ध भूमिका घेऊन आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
औरंगाबादचे नामांतर केल्यानं मुस्लिम समाज म्हणजे अल्पसंख्याक नाराज होतील आणि व्होट बँकेवर परिणाम होईल. म्हणजे स्वत:च्या सेक्युलर प्रतिमेवर प्रश्चचिन्ह निर्माण होईल, असं अग्रलेखात म्हणत शिवसेनेने काँग्रेसवर जाहीरपणे टीका केली आहे.
औरंगाबादचं नामांतर केल्याने लोकांचे, विकासाचे प्रश्न सुटणार आहेत काय? असे मुद्दे नाव बदलण्यास विरोथ करणारे उपस्थित करत आहेत. ते काही असले तरी औरंगजेबाच्या कोणत्याही खुणा निदान महाराष्ट्रात तरी ठेवू नयेत या मताचा मोठा वर्ग असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रसेने जाहीरपणे नामंतराला विरोध केला होता. शिवसेनेनेही आता काँग्रेसवर जाहीरपणे टीका केली आहे. यावर काँग्रेसचं काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
“केंद्रीय मंत्री किंवा सरकारमधील कोणत्या नेत्याने लस का टोचून घेतली नाही”
…म्हणून पुढचे 2 दिवस मुंबईसह राज्यात कोरोना लसीकरण बंद राहणार
IAS सुनील केंद्रेकर यांचा साधेपणा; पत्नीसह केंद्रेकर दिसले आठवडी बाजारात
‘…त्यावेळी आम्ही कोरोनावरील लस घेऊ’; राजनाथ सिंह यांनी सांगितली वेळ
“…तर अधिवेशनाच्या पहिल्याच भाषणात मी त्यांचं मोठ्या मनाने अभिनंदन करेल”