थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं; सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारता’चं जे स्वप्न पाहिलं होतं ते काल धुळीस मिळालं. त्या स्वप्नाची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं, असंही या अग्रलेखात लिहिलं आहे.

जनतेनं नको त्या नेत्यांना उखडून फेकलं आहे, अशा कडक शब्दात सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

दरम्यान, जनतेकडून उचलण्यात आलेल्या पावलाचं आणि निवडणूक निकालांचं अग्रलेखात कौतुक करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नव्हे भाजपला मिळाली आहेत सर्वात जास्त मतं…

-“पंतप्रधान नरेंद्र मोदीच आता लोकांना भ्रष्ट वाटायला लागले आहेत”

“राज तिलक की करो तय्यारी, आ रहे है नितीन गडकरी”

-लोक म्हणतात, नोटा… नोटा… नोटा; आप आणि सपालाही टाकलं मागे

-मोदींच्या सिंहासनाला तडा; राज ठाकरेंचा वर्मावर वार