मुंबई | देशात सध्या कोणाच्या दबावाखाली निर्णय घ्यावा अशी परिस्थितीदेखील नाही. तरीही गोपाळ शेट्टीं गुन्हेगार का ठरले? असा प्रश्न उपस्थित करत हे निव्वळ राजकारण आहे, अशी टीका शिवसेेनेचं मुखपत्र सामनातून केली आहे.
ख्रिश्चन हे मूळ ब्रिटीश आहेत. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार गोपाळ शेट्टींनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होत आहे.
दरम्यान, ख्रिश्चन समाज जेवढा भडकला नसेल तेवढे राजकीय पक्षांचे झगेवाले भडकले आहेत, कारण ख्रिस्ती बांधवांच्या प्रेम-आदराचा विषय नसून सरळसरळ मतपेटीचा विषय आहे, म्हणून गोपाळ शेट्टी यांना गुन्हेगार ठरवून हल्ले केले गेले, असंही अग्रलेखात म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-शरद पवारांनी आंब्यावर भाष्य करताच सभागृहात हशा!
-अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा भारताचा पहिलाच खेळाडू!
-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजच्या काळातील चाणक्य आहेत- अमित शहा
-विराट कोहलीवर का संतापली अनुष्का शर्मा???
-अमित शहांचा कानमंत्र; भाजप आयटी सेल यापुढे शरद पवारांना लक्ष्य करणार?
Comments are closed.