Top News महाराष्ट्र मुंबई

“कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे यावरून अर्थसंकल्प तयार होऊ लागला तर कसं व्हायचं?”

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

निर्मला सीतारामन निवडक राज्यांच्या नाही तर संपूर्ण देशाच्या अर्थमंत्री आहेत. त्यामुळे देशाचा अर्थसंकल्प जाहीर करताना निवडणुका डोळ्यांसमोर ठेवल्या जात असतील किंवा कुठल्या राज्यात कोणाची सत्ता आहे याचा विचार करून देशाचा अर्थसंकल्प तयार होऊ लागला तर कसं व्हायचं?, असा खोचक सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.

निवडणुका जवळ आलेल्या राज्यांना भरभरून देणारे केंद्र सरकार देशाच्या तिजोरीत सर्वाधिक योगदान असलेल्या महाराष्ट्राकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

नागपूर आणि नाशिकच्या मेट्रो प्रकल्पासाठी केलेली तरतूद वगळली तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाट्याला बजेटमध्ये काहीच नाही. हा भेदभाव कशासाठी? देशाच्या अर्थखात्याने समग्र देशाचा विचार केला पाहिजे, असंही अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट, महाराष्ट्रासाठी काय?- आदित्य ठाकरे

संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा अर्थसंकल्प आहे- देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पानं देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय- अजित पवार

बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल- नरेंद्र मोदी

आत्मनिर्भर भारत म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात…- अमोल कोल्हे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या