Top News महाराष्ट्र मुंबई

‘एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर….’; शिवसेनेचा पलटवार

photo credirt- Amit Shah & Narayan Rane Facebook Account
photo credirt- Amit Shah & Narayan Rane Facebook Account

मुंबई | एखाद्याच्या पायगुणात इतकी ताकद असती तर हे महाविकास आघाडीचे सरकार आलेच नसते. शर्थ आणि पराकाष्ठा करूनही ‘ठाकरे सरकार’ सत्तारूढ होण्यापासून कोणी रोखू शकलं नसल्याचं शिवसेनेच्या अग्रलेखात संझय राऊतांनी म्हटलं आहे.

अमित शहा यांच्यात आणि शिवसेनेच्या कार्यपद्धतीत एक साम्य आहे. शिवसेनासुद्धा जे करते तेसुद्धा ‘डंके की चोट’पर करते. तसं नसतं तर काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर उघडपणे सत्ता स्थापन केली नसती, असंही राऊतांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

फडणवीस यांचा पहाटेच्या अंधारातला शपथविधी हा उघडपणाच्या आणि ‘डंके की चोट’च्या कोणत्या व्याख्येत बसतोय पण ठीक आहे. धुरळा उडवायचा म्हटल्यावर या अशा उडवाउडवीकडे दुर्लक्ष करायला हवं, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

दरम्यान, परमेश्वराची कृपा म्हणून भाजपला शब्द फिरविण्याची दुर्बुद्धी सुचली आणि शिवसेनेस हे ‘अच्छे दिन’ दिसले. त्याबद्दल महाराष्ट्राची जनता अमितभाई शहा यांची सदैव ऋणी राहील, असं म्हणत राऊत यांनी अमित शहांना टोला लगावला.

थोडक्यात बातम्या-

“…त्यांच्या गोवऱ्या महाराष्ट्राने स्मशानात पोहोचवून जिवंतपणीच श्राद्धे घातलीत”

‘वा रे वा… महाराष्ट्राचे कारभारी लयभारी’; शेलारांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं’; आव्हाडांचा अमित शहांना टोला

“भारतरत्नांची चौकशी करणारे असे रत्न देशात कुठेही सापडणार नाहीत”

…तर माझ्या बापाची औलाद सांगणार नाही; हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या