Top News महाराष्ट्र मुंबई

महाविकास आघाडीत कुरबुरी; शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून टोचले काॅंग्रेसचे कान

मुंबई | राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र सत्ता स्थापन केली. यामध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपद तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद आणि काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. मात्र काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. याच पारश्वभूमीवर शिवसेनेने अग्रलेखातून काँग्रसचे कान टोचले आहेत.

काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद पाच वर्षासाठी दिलं. फक्त एका वर्षात राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घेण्यासाठी नाही, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

काँग्रेसने त्यांचा पक्षांतर्गत बदल केला हा त्यांचाच अधिकार, पण सरकार, विधानसभा, बहुमताचा आकडा यावर त्या निर्णयाचा परिणाम होणार नाही यासाठी सावधान राहावं लागेल, असंही अग्रलेखातून सुचवलं आहे.

दरम्यान, काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळत आहे त्याच बरोबर विधानसभेला नवा अध्यक्ष मिळेल. नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षपदावरुन गेले, पण काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राज्याच्या मुख्य प्रवाहात परत आले. म्हणजे नाना गेले, नाना आले, असं म्हणत शिवसेनेने नानांना शुभेच्या दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

सचिन तेंडुलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?- देवेंद्र फडणवीस

सामान्य माणसाच्या उन्नतीचा आणि उत्थानाचा विचार हा काँग्रेसचा गाभा- बाळासाहेब थोरात

महाविकास आघाडी सरकार संधीसाधू, त्यांना जनतेशी देणंघेणं नाही- गिरीष महाजन

“सचिनला भारतरत्न देणं चुकीचं, हा भारतरत्न या सन्मानाचा अपमान”

श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या