“गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार”
मुंबई | गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करत आहेत. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमात सावंत हे थापेबाजी करत आहेत त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल. गोव्यात निवडणुका आल्या की नवे पक्ष, नव्या आघाड्या निर्माण होतात, स्वतःचे दोनेक आमदार निवडून आणतात व जे सरकार येईल, त्यांच्यात सामील होऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात. यात गोव्याचे नुकसानच झाले आहे. गोव्यातील उद्याच्या निवडणुकांत तरी हे चित्र बदलावं, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
गोव्यात उद्याच्या निवडणुकांमध्ये तरी हे चित्र बदलावे. अल्बुकर्कने गोवा जिंकले आणि 450 वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखाली ठेवले. गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार आहेत. गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा असे कुणालाच का वाटू नये?, असा सवालही अग्रलेखात करण्यात आला आहे.
दरम्यान, गोव्यात 17 आमदारांवरुन काँग्रेस पक्ष चारवर आला. भाजपचा आकडा फुगला हे काही नैतिकतेचे राजकारण नाही. भाजपने स्वबळावर 20-25 जागा जिंकून सत्ता मिळवली असती तर त्यांची पाठ थोपटता आली असती, पण गोव्यात तसं काहीच झालं नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
IPLच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी दोन सामने, बीसीसीआयचा मोठा निर्णय!
शिवभोजन थाळी आता मोफत नाही, 1 ऑक्टोबरपासून ‘इतक्या’ रुपयांना मिळणार थाळी!
पांड्या इज बॅक! सलग तीन पराभवानंतर मुंबईची गाडी विजयी पथावर, पाहा व्हिडीओ
भावा तूच रे! कृणाल पांड्याच्या खिलाडूवृत्तीमागे हिटमॅन रोहितचाही हात, पाहा व्हिडीओ
…तर आपलं सीट शंभर टक्के निवडून आलं समजा- सुप्रिया सुळे
Comments are closed.