बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल!”

मुंबई |  आज भारताच्या जवानांकडे लढण्यासाठी सर्वकाही आहे, पण तरीही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रूर बळी घेतले. पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल, असा टोमणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

मोदी म्हणतात, डिवचल्यास उत्तर देऊ. 20 जवानांना हाल हाल करून मारले हे डिवचणे नाही तर काय? नेहरूंच्या काळात चिन्यांशी लढताना आमचे सैनिक विषम स्थितीत होते. साधे कॅनव्हासचे बूट, शस्त्र-गोळ्यांची टंचाई, अनोळखी प्रदेश अशी तेव्हा परिस्थिती होती. आज सर्वकाही आहे, पण तरीही चिन्यांनी आमच्या जवानांचे क्रूर बळी घेतले. पंडित नेहरूंना दोष देणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले तरी 20 जवानांचे बलिदान सार्थकी लागेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

ज्या ट्रम्प यांच्यासाठी मोदी यांनी चीनशी पंगा घेतला आहे ते ट्रम्प म्हणे व्हाईट हाऊसमध्ये बसून हिंदुस्थान-चीन तणावावर लक्ष ठेवून आहेत. त्याने काय होणार? पाकिस्तानबरोबरचे युद्ध 1971 साली झाले व अमेरिका पाकिस्तानला मदत करण्याचे चित्र समोर आले तेव्हा रशियाने त्यांचे सातवे आरमार इंदिरा गांधींच्या मदतीसाठी पाठवले. त्याबरोबर अमेरिकेने माघार घेतली. प्रे. ट्रम्प त्यांचे मित्र मोदी यांच्या मदतीसाठी अशी काही ताकद पाठवणार आहेत काय?, असा सवालही त्यांनी अग्रलेखातून उपस्थित केला आहे.

रक्षण आणि परराष्ट्र या दोन महत्त्वाच्या खात्यांतील अविभाज्य संबंधांचे आपल्याला विस्मरण झाले आणि त्यापायीच 1962 च्या ऑक्टोबरमध्ये चीनने एक धक्का देताच आपली नामुष्की झाली. त्या चुकीचे खापर आपण पंडित नेहरूंवर फोडत राहिलो. पण त्या चुकीपासून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा घेतला असे दिसत नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

..म्हणून चीन विरोधात शौर्य गाजवलेल्या बिहार रेजिमेंटला ‘किलर मशीन’ म्हणतात!

“मोदीजी…माझ्या पतीचं बलिदान व्यर्थ जायला नको, चीनी सैनिकांना ठार मारा”

महत्वाच्या बातम्या-

20 जवानांना मारलं तरी आणखी डिवचायचं राहिलंय काय?, सामनातून आज पुन्हा एकदा मोदींवर टीकेची झोड

…म्हणून पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘चिनी खुळखुळे’ भेट

चिंता वाढली… पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More