बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल, कोरोना संकटावर मात करून हिमालयाला दिशा दाखवेल”

मुंबई |  आज 1 मे अर्थात महाराष्ट्रात दिन. महाराष्ट्र आज 61 व्या प्रवेश करतोय. मात्र यंदाच्या महाराष्ट्र दिनाला कोरोनारूपी संकट आपल्या मानगुटीवर बसलं आहे. परंतू देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल, कोरोना संकटावर मात करून हिमालयाला दिशा दाखवेल, असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणततात, “करंटेपणा, नतद्रष्टपणा, अप्पलपोटेपणा व द्वेष-द्रोह यांना डावलून जेथे जेथे माणुसकी उसळून प्रकट होते तेथे तेथे महाराष्ट्र धर्म मूर्तिमंत प्रकट झालेला असतो. हा ‘महाराष्ट्र धर्म’ वाढता वाढतच जाईल. महाराष्ट्रीय आचार-विचारांचा मानदंड हिंदुस्थानात प्रस्थापित होईल. देशाला आलेली ग्लानी शिवरायांचा महाराष्ट्र दूर करेल. हिरक महोत्सवी महाराष्ट्र कोरोनाच्या संकटावर मात करून हिमालयासही दिशा दाखविल्याशिवाय राहणार नाही”

महाराष्ट्राचा हिरक महोत्सव एरव्ही मोठ्या थाटामाटात साजरा झाला असता, पण हा महाराष्ट्र दिन एका वेगळ्याच सावटाखाली उगवला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री आज आहे व ते उद्धव ठाकरे आहेत. त्या आनंदास आजच्या महाराष्ट्र दिनी आनंदाचे उधाण आले असते. महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोना संकटाशी लढत असताना महाराष्ट्र दिनाचा 60 वा सूर्य उगवला आहे. सूर्य नेहमीप्रमाणे प्रकाशमान, तेजस्वी आहेच, पण जनता सरकारी आदेशाने कुलूप बंद आहे. शेवटी महाराष्ट्राच्या तेजस्वी लढय़ाच्या या आठवणी अमर राहणारच!, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र हा लढवय्या आहे व तो या संकटाला परतवून लावेल. हे लढवय्येपण महाराष्ट्राच्या दुश्मनांबरोबर दाखवता येईल, पण ही लढाई राज्याच्या अस्मितेची, उद्योगधंदे, रोजगार वाचविण्याची आहे. दीड महिन्यापासून राज्यात टाळेबंदी आहे. उद्योग-व्यापारास टाळे आहे व आतापर्यंत तीन लाख कोटींचे नुकसान झाले आहे. हे नुकसान राज्याच्या प्रगतीस खिळ घालणारे आहे. विजयी उन्मादाच्या आरोळय़ा ठोकून, राजकीय कुरघोडय़ा करून हे संकट दूर होणार नाही. शेवटी ‘महाराष्ट्र धर्म’ नावाचा जो मंत्र आहे तो काही जादुटोणा किंवा अंधश्रद्धा नाही. हा मंत्र मराठीजनांच्या घामातून, श्रमातून निर्माण झाला आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यातील ‘या’ भागात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध; किराणा, भाजीपाला बंद

“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार!

“महाराष्ट्र पोलिसांवर हल्ले होतायेत आणि गृहमंत्री विचारतायत विरोधी पक्ष काय करतोय?”

अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; लाखो डॉलर्सची मदत करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More