मुंबई | नेपाळ हे जगाच्या पाठीवरील एकमेव हिंदू राष्ट्र. श्रीराम आणि सीतामाईंशी नात्याने जोडलेला हा देश, पण नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केलं, असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्र सरकारला करण्यात आला आहे.
नेपाळचा घास याआधीच चिनी ड्रॅगनने गिळला आहे. नेपाळमध्ये जाऊन हस्तक्षेप करणे म्हणजे दुसऱ्या देशातील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे या सबबीखाली आपण नेपाळचा रंग बदलताना उघड्या डोळ्याने सहन केला. मग आता नेपाळला फुकट सल्ले देण्यात काय फायदा?, असं अग्रेलाखात संजय राऊतांनी म्हटलं आहे.
चीनने नेपाळची संस्पृती बदलण्याचा प्रयत्न चालविला आहे. चिनी भाषा शिकवणारे 25,000 शिक्षक नेपाळच्या गावागावात घुसवले आहेत. चीनने नेपाळला कर्जाच्या ओझ्याखाली दाबलं असल्याचं अग्रलेखात सांगितलं आहे.
दरम्यान, नेपाळला चीनपासून सावध राहण्याचा इशारा देत आहेत. सावध राहण्याची खरी गरज आम्हाला म्हणजे हिंदुस्थानला आहे. नेपाळ हातचा गेलाच आहे. लडाखमध्ये घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर कसं काढणार हे सांगा, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या-
“तेव्हा ढसाढसा रडणारे अजित पवार आता मोठा टग्या असल्याचा आव आणत आहेत”
कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत-पंतप्रधान नरेंद्र मोदी
“उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा”
…म्हणून तर आम्ही 105 आमदार घरी बसवले आहेत- संजय राऊत
CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार; ‘या’ सरकारनं घेतला मोठा निर्णय