Top News महाराष्ट्र मुंबई

“… तर 1000 कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी”

मुंबई | देशाच्या नवे संसद भवन आता लवकरच उभे राहणार आहे. सुमारे 1000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदींवर निशाणा साधला आहे.

अधिवेशने, चर्चा होणारच नसतील तर 1000 कोटी खर्च करून नव्या संसद भवनाचा घाट आणि थाट कशासाठी?, अस सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान चार आठवडे आजारी हाते. तो काळ सोडला तर ब्रिटनच्या संसदेनेही प्रश्नोत्तराचा तास कधी टाळला नाही. जगातील 105 देशांत संसदीय लोकशाही असून दुर्दैवाने त्यापैकी भारत आणि रशिया या दोनच देशांनी संसदेचे अधिवेशन घेण्याचं टाळलं असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सध्याचे संसद भवन आणखी किमान 50-75 वर्षे सहज चालले असते. ते काही ठिकाणी गळते, ही तक्रार सोडली तर त्या लोकशाही मंदिराचे बांधकाम मजबूत असल्याचं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जाऊन काँग्रेसने लाचारी पत्करली”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

‘भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच’; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी अखेर भाई जगताप यांची नियुक्ती

“कंगणाला दिवसातून एकदा माझं नाव घेतल्याशिवाय जेवण पचत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या