Top News महाराष्ट्र मुंबई

…तरच मुंबई पुण्याची गर्दी कमी होईल, संजय राऊतांनी गडकरींना ठणकावलं

मुंबई | भविष्यात मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमधून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या मतावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्राच्या ध्येयधोरणावर भाष्य करण्यात आलं आहे. तसंच नितीन गडकरींना टोले देखील आजच्या अग्रलेखातून लगावण्यात आले आहेत.

केंद्राने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा राज्यांकडे आणि दिल्लीसारख्या शहरांकडे जास्त लक्ष दिले तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, असं अग्रलेखात म्हटलं गेलं आहे. महाराष्ट्राच्या विकासाचे काय ते आम्ही पाहू. मुंबई-पुण्यावर आदळणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्राने इतर राज्यांमध्ये रोजगार व पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर गडकरींची चिंता दूर होईल, असंही सामनामधून सांगण्यात आलं आहे.

मुंबईबाहेर स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज अशा प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात झाली पाहिजे अशी गडकरी यांची सूचना आहे. ही सूचना चांगली आहे, पण संपूर्ण देशात अशा शंभरावर स्मार्ट सिटीज वगैरे उभारण्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. त्यापैकी किती प्रकल्पांच्या विटा रचल्या गेल्या?, असा सवाल देखील केंद्राला विचारला आहे.

25 जून, 2015 रोजी शंभर शहरांसाठी ‘स्मार्ट सिटी मिशन’ हा कार्यक्रम सुरू झाला, पण आता 2020 वर्ष सुरू झाले तेव्हा या स्मार्ट सिटींचे पंधरा टक्के कामही सुरू झाले नव्हते. मुंबई, दिल्ली, लखनौ आणि कोलकाता यांसारख्या शहरांवर लोकसंख्या, पायाभूत सुविधांचा बोजा वाढल्याने मोठय़ा शहरांबाहेर नवे शहर उभे करायची ही योजना चांगली होती, पण ती फक्त घोषणेपुरतीच राहिली, असंही राऊत म्हणालेत.

महाराष्ट्रात पुणे, नाशिक आणि नागपूर ही तीन शहरे स्मार्ट सिटी करण्याच्या योजना होत्या. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प 3 हजार 355 कोटींचा आहे. नागपूर व पुण्याला आतापर्यंत किती पैसे मिळाले? मुंबईने देशाच्या लोकसंख्येचे व दिल्लीच्या तिजोरीचे ओझे नेहमीच छाताडावर घेतले, पण संकटकाळात सावरण्यासाठी मुंबईला केंद्राने कधीही सढळ हस्ते मदत केली असे दिसले नाही, असा निशाणाही राऊत यांनी साधला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

शुभमंगल साssवधान!, लग्नासाठी बोलावलेल्या पाहुण्यांपैकी 15 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

महत्वाच्या बातम्या-

गडकरींचं एक वक्तव्य अन् संजय राऊतांनी वाचून दाखवला मुंबईचा सारा इतिहास!

तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडकडे लक्ष दिलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, गडकरींना कानपिचक्या

‘या माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा!’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गुंतवणूकदारांना साद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या