Top News महाराष्ट्र मुंबई

“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”

मुंबई | शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं असल्याचा आरोप शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे. शिवसेनेनं अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

सरकार कोणाचंही असो आणि पंतप्रधान पदावर कोणीही विराजमान असो तिरंग्याचे रक्षण करणं त्याचं प्रथम कर्तव्य ठरतं. म्हणून मोदींच्या भावना महत्वाच्या आहेत. पण 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे?, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा एक गट दिल्लीत घुसला. त्यावेळी तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. मात्र चित्रीकरण समोर आलं त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचं कुठेच दिसत नाही. तिरंगा डौलाने फडकतच होता पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं असा आरोप शिवसनेने अग्रलेखातून केला आहे.

दरम्यान, तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा’ आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱ्यांना प्यारा आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

धनंजय मुंडेंचं औरंगाबादमध्ये जंगी स्वागत; क्रेनद्वारे घातला फुलांचा हार

कोरोनानंतर पुन्हा एकदा नाईट लाईफ सुरु करणार- आदित्य ठाकरे

“संजय राऊत महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांना कधी भेटले नाहीत”

“जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…”

“राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या