Top News महाराष्ट्र मुंबई

“…तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल”

मुंबई | श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधलं जात आहे, असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टोला लगावण्यात आला आहे.

मंदिराच्या निर्माणकार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख स्वयंसेवक वर्गणीसाठी दारोदार फिरतील. हे स्वयंसेवक नक्की कोण? त्यांना कोणी नेमले आहे?, असे सवाल शिवसेनेने अग्रलेखातून विचारले आहेत.

स्वयंसेवकांची नेमणूक राम मंदिर वर्गणीसाठी झाली असेल तर त्या स्वयंसेवकांची पालक संघटना कोणती, हे स्पष्ट झाले तर बरे होईल. वर्गणीच्या नावाखाली हे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल, असं शिवसेनेने म्हटलं आहे.

दरम्यान, मंदिराचा लढा हा राजकीय नव्हता. तो समस्त हिंदू भावनांचा उद्रेक होता. त्याच उद्रेकातून पुढे हिंदुत्वाचा वणवा पेटला व आजचा भाजप त्याच वणव्यावर भाजलेल्या “पोळ्या खात आहे, अशी टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

“वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरुच आहे, अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचं”

“मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार हे ठरलंय”

‘शेतकरी आंदोलन हे फक्त मूठभर दलालांचंच आहे’; कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

‘निट काढलास ना रे फोटो’; सहा वर्षाच्या रुद्रने केलं पाटलांचं खास फोटोशुट

…अन् कोरोनाच्या लसीकरणानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली; पाहा व्हिडीयो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या