मुंबई | राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो करसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचं?, असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे, अशी टीका करत रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हातरी थांबवायलाच हवा, असं अग्रेलखात म्हटलं आहे.
मंदिराच्या निर्माणकार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख स्वयंसेवक वर्गणीसाठी दारोदार फिरतील. हे स्वयंसेवक नक्की कोण? त्यांना कोणी नेमले आहे?, असे सवाल अग्रलेखातून करण्यात आले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी यांनी राममंदिर बांधकामात निधीची चिंता करू नये, असे बजावले आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाचे मंदिर हे देशाच्या अस्मितेचे मंदिर आहे व त्यासाठी जगभरातील हिंदुत्ववाद्यांनी आधीच खजिना रिकामा केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य करणार?, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार हे ठरलंय”
‘शेतकरी आंदोलन हे फक्त मूठभर दलालांचंच आहे’; कृषीमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्
‘निट काढलास ना रे फोटो’; सहा वर्षाच्या रुद्रने केलं पाटलांचं खास फोटोशुट
…अन् कोरोनाच्या लसीकरणानंतर नर्स चक्कर येऊन कोसळली; पाहा व्हिडीयो
कोहलीला रनआऊट करण्यावरून शोएब अख्तरची अजिंक्य रहाणेवर टीका; म्हणाला…