Top News महाराष्ट्र मुंबई

“शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं ही सर्वांची इच्छा पण इतकी आदळआपट का?”

मुंबई | शरजिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावं आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे पण इतकी आदळआपट करायची गरज नाही, असं म्हणत शिवसनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

हिंदुत्व रस्त्यावर पडलं आहे काय?, हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी 90 दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू, शीख शेतकऱ्यांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा, असा सवालही अग्रलेखातून फडणवीसांना करण्यात आला आहे.

रस्त्यावरचा शेतकरी त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आता त्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळ्यांची बिछायत अंथरली. हा समस्त हिंदू शेतकऱ्यांचा सन्मान म्हणावा काय?, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान,  शेतकऱ्यांनी तर कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे भाजप पुढाऱ्यांनी रस्त्यावरच्या या हिंदुत्वाची थोडी फिकीर केली तर बरे होईल, असा टोलाही अग्रलेखातून लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोणताही प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही- अमित शहा

अबबबब… आतापर्यंत गप्प असलेल्या सेलिब्रेटींना एकाकी फुटली वाचा

करूणा शर्मांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले…

शेतकरी आंदोलन : सचिन तेंडुलकरनं केलेल्या ट्विटनं एकच खळबळ

मी राज्यपाल नाही, तर…- भगतसिंह कोश्यारी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या