Top News महाराष्ट्र मुंबई

हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत- संजय राऊत

मुंबई | हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरीउत्तरेत आहे आणि तिथून तयार झालेला माल देशभरात जात असतो, असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी शरजिलच्या प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योग आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरजिलरख्या हिंदुत्वद्रोही घाणीचा उगम होतो कोठून? त्याचे धागेदोरे शेवटी योगीराज्यातच जातात. हा शर्जिलही आता पळून उत्तर प्रदेशातील अलिगढला लपला आहे. महाराष्ट्राचे पोलीस अलिगढला जाऊन मुसक्या आवळतीलत, असंही अग्रलेखात सांगितलं आहे.

हिंदुत्व विरोधकांच्या मुसक्या महाराष्ट्र आवळेलच पण थोडी जबाबदारी योगी राज्याचीसुद्धा आहे. पळून जाऊन लपून बसलेल्या शरजिलला महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात देण्याची जबाबदारी योगींची असून त्यानी या कामात हस्तक्षेप करून नये, असं राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना आहेच. सरकारचे सूत्रधार ठाकरे आहेत. त्यामुळे कायदा आहे तसा हाती दंडुकाही आहेच. म्हणूनच हिंदुत्वावर वाकडेतिकडे हल्ले कोणीच सहन करणार नसल्याचं राऊतांनी अग्रलेखात नमूद केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी आंदोलन- लता मंगेशकर यांचाही सरकारच्या भूमिकेला पाठिंबा, म्हणाल्या…

मुंबईचा नाही, हा तर वरळीचा अर्थसंकल्प”

“आता वर्ष उलटलं, यांना मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईनच करत बसाव लागेल”

दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…

अबब! या सेक्स रॅकेटवरील कारवाईनं पुण्यात खळबळ; इतक्या तरुणींना घेतलं ताब्यात

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या