बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चीनला आर्थिक आघाड्यांवर मारायचं, त्यादृष्टीने पहिला बांबू ‘ठाकरे सरकार’ने घातलाय”

मुंबई |  गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन वाद आता टोकाला पोहचला आहे. चीनची भारताची संबंधित असेलेली आर्थिक गणित बिघडवण्याचं भारत सरकारने तसंच महाराष्ट्र सरकारने ठरवलं आहे. यावरतीच आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाचा अग्रलेख लिहीत चीनवर टीकेचे बाण सोडले आहेत. तसंच पंतप्रधान मोदींना देखील त्यांनी टोले लगावले आहेत.

महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांची परंपरा सांगतो. हिंदुस्थानी जवानांशी असे निर्घृणपणे वागणार्‍या या चिनी माकडांशी व्यापार -उद्योग करणे हा त्या जवानांच्या हौतात्म्याचा अपमान ठरेल. चीनला जमिनीवर फक्त इंच इंच मारायचे नाही , तर आर्थिक आघाडीवर पैशापैशालाही मारा्वे , या भूमिकेतून ठाकरे सरकारने पहिला बांबू घातला आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’अंतर्गत चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले तीन करार ठाकरे सरकारने तूर्त रोखले आहेत, असं अग्रलेखात म्हटलंय.

या करारानुसार या चिनी कंपन्या महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार होत्या. हे सर्व करार गलवान खोर्‍यात जो रक्तपात झाला त्याआधीच झाले होते. त्यामुळे हे करार रद्द करण्याची नैतिक जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर नव्हती, पण महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांची परंपरा सांगतो, असंही राऊत म्हणालेत.

संजय राऊत अग्रलेखात म्हणतात-

“अनेक अमेरिकन, युरोपियन उद्योगांनी चीनमधून गाशा गुंडाळला आहे. हे उद्योग आपल्या राज्यांमध्ये यावेत यासाठी हिंदुस्थानातील अनेक राज्ये प्रयत्न करीत आहेत. गुजरात आणि उत्तर प्रदेश ही दोन भाजपशासित राज्ये त्यात जास्त पुढाकार घेत आहेत. चीनमधून झटकलेला एकही उद्योग इतर राज्यांच्या मार्गाने जाऊ नये यासाठी काही राज्यांनी ‘वाटमारी’ सुरू केल्याचेही समोर आले आहे. हे उद्योग हिंदुस्थानात यावेत आणि त्यातून देशाची प्रगती व्हावी असा व्यापक विचार कोणी करताना दिसत नाही.”

“आताही गलवान खोर्‍यात चिन्यांनी आमच्या सैनिकांचे रक्त सांडताच महाराष्ट्राने चिन्यांबरोबरचे उद्योग करार रद्द केले. तसे धाडसी आणि राष्ट्रभक्तीचे पाऊल इतर राज्यांनी अद्याप का उचलू नये? उत्तर प्रदेश, गुजरात आणि हरयाणा या राज्यांत किती चिनी कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे? सध्याच्या परिस्थितीत तेथील राज्य सरकारे त्या चिनी गुंतवणुकीबाबत काय निर्णय घेणार आहेत? की त्याग, राष्ट्रभक्तीचा मक्ता फक्त महाराष्ट्राच्या वाट्यालाच आला आहे?”

ट्रेंडिंग बातम्या-

राजस्थानमध्ये आकाशातून पडलेल्या ‘या’ वस्तूची किंमत खरंच करोडो रुपये आहे का?

सुशांतच्या दोषींना सोडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शब्द

महत्वाच्या बातम्या-

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात आदित्य ठाकरेंनी थोपटले दंड, केंद्रिय मंत्र्याला लिहिलं पत्र…

पुण्यात काल नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त! वाचा पुण्याची कोरोना स्थिती….

तुकाराम मुंढेंच्या आयुष्यात पहिल्यांदाच गैरव्यवहाराचा आरोप, महापौरांनी उचललं मोठं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More