Top News महाराष्ट्र मुंबई

…अशा वेळी संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या मागे उभा असायला हवा- शिवसेना

मुंबई |  शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात चीनशी कोणी लढायचे? या मथळ्याखाली आज अग्रलेख लिहीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला टोले लगावले आहेत. तर काही प्रश्न देखील विचारले आहेत. काँगेस पक्षाशी भाजपला नंतर केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला!, असं ते म्हणाले आहेत.

संजय राऊत अग्रलेखात म्हणतात-

“एका बाजूला चर्चेचे नाटक करायचे व दुसऱ्या बाजूला सीमेवर युद्धाच्या तोफा धडधडत ठेवायच्या हे चीनचे धोरण नवे नाही. गलवान खोऱ्यातून सैन्य-माघारीचे नाटक करायचे व दुसऱया बाजूला डेपसांग पठारावर सैन्य घुसवायचे. डेपसांगमधून मागे हटायचे व अरुणाचलमध्ये घुसायचे. हिंदुस्थानला चर्चेत ठेवून हवे ते घडवायचे ही चीनची नीती आहे. अशा वेळी संपूर्ण देश पंतप्रधान मोदींच्या मागे उभा असायला हवा. तसा तो उभा राहिलेला दिसत आहे.”

“हे संकट भाजप किंवा काँगेसवर नाही; तर देशावरील संकट आहे. संपूर्ण देशाचीच प्रतिष्ठा आणि प्रतिमा पणास लागली आहे. काँगेस पक्षाच्या राजीव फाऊंडेशनला कोणत्या देशातून पैसे मिळाले यावर भाजपने यापूर्वी अनेकदा चर्चा केल्या. त्यात नवीन काय? आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष व पुढारी हे परराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. फक्त काँग्रेसच नाही. भाजपने तर यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे.”

“हमाम मे सब नंगेच आहेत! पण सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा. गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काँगेस पक्षाशी भाजपला नंतर केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला!”

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 5 हजार 24 कोरोना रुग्णांची भर

तेव्हापासून आमच्या कुटुंबात फारसा संवाद नव्हता पण…; धनंजय मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया

महत्वाच्या बातम्या-

ठाणे जिल्ह्यात कोरोना धुमाकूळ… मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली दिलासादायक बातमी

वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यभरात….; उर्जामंत्र्याचे स्पष्ट निर्देश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या