Top News महाराष्ट्र मुंबई

ममता बॅनर्जींचा वीक पॉइंट भाजपने ओळखलाय, दीदींनी चिडायला नव्हतं पाहिजे- संजय राऊत

मुंबई | जय श्री रामच्या घोषणेवरुन ममता बॅनर्जी यांनी चिडायची गरज नव्हती, याउलट त्यांच्या सुरात सूर मिसळायला हवा होती. कारण, निवडणुका होईपर्यंत भाजपवाले अशा नाजूक विषयांवर मर्मभेद करीत राहतील, असं शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात घडलेल्या घटनेवरून राऊतांनी ममता बॅनर्जींना सल्ला दिला आहे.

ममता बॅनर्जींनी जय श्रीरामच्या नाऱ्यावर चिडू नये या मताचे आम्ही आहोत. उलट त्यांच्या सुरात सूर मिसळला असता तर डाव समोरच्यांवरच उलटला असता असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हिंदुत्वाच्या मुद्यांवर ठरवून ठिणगी टाकायची हे भाजपने ठरवलेलं आहे. तसं नसतं तर कोलकात्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती कार्यक्रमात वादार्चीं ठिणगी पडली नसती, असंही अग्रलेखात नमूद केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“ज्यांच्याबरोबर लढायचे त्यांचेच लोक फोडून फौज तयार करायची”

बॉयफ्रेंडसाठी सख्ख्या मैत्रिणीची केली हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

“रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे नक्की वाचा”

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; शिवसेना नेत्यानं शरद पवारांच्या विरोधात दंड थोपटले!

“पुरंदरमधील विमानतळ बारामतीला पळवण्याचा शरद पवारांचा डाव”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या