महाराष्ट्र मुंबई राजकारण

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

मुंबई | चीनी सीमेवर चौक्या आणि बंकर उभ्या राहत असताना भारतात भाजप विरूद्ध काँग्रेस युद्ध सुरू आहे. देशाची सुरक्षा व राष्ट्रीय सुरक्षा या विषयात कोणी राजकारण करू नये असं म्हणत पवार यांनी या युद्धात काडी टाकली आहे, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

चिनी घुसखोरीचे राजकारण करू नये, हे पवारांचं म्हणणे अगदी बरोबर आहे. भाजप पुरस्कृत समाजमाध्यमांकडून पवारांचा हा टोला काँग्रेसला असल्याचं बोललं जात आहे. मात्र पवारांचा हा टोला सरकारी पक्षालाही तितकाचं लागू पडतो, असं म्हणत शिवसेनेनं सामनातून भाजपवर सडकून टीका केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरी संदर्भात विचारलेले प्रश्न हे पाण्यावरील बुडबुडे नाहीत. हेच प्रश्न कदाचित शरद पवारांच्याही मनात घोळत असतील, असं असं अग्रलेखात म्हटलंय.

दरम्यान, चीनच्या प्रश्नावरून सरकार व विरोधकांत चांगलीच जुंपली असल्याचं पहायला मिळत आहे. चीनला चोख प्रत्युत्तर देऊ असा निर्वाणीचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीच दिला आहे. मात्र तत्पूर्वी चीनच्या घुसखोरीमुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘कोरोना काळात भ्रष्टाचार करण्याची हीच ती वेळ’; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल

पंढरपूरमध्ये महापूजेला मुख्यमंत्र्यांसह दत्ता भरणेंना प्रवेश द्या- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या