Top News महाराष्ट्र मुंबई

मोदी सरकारने दुसऱ्यांचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत”

मुंबई | दिल्लीत गेल्या 50 दिवसांपासून शेतकरी आंदोलन चालू आहे. केंद्राने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. याचा पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

सरकारने दुसऱ्यांचे खांदे भाड्याने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत. सरकारने कृषी कायदे रद्द केले तर आम्ही माघारी जाऊ, असं शेतकरी वारंवार सांगत असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतात इतके कठोर आणि शिस्तबद्ध आंदोलन झाले नव्हते. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांच्या या हिंमतीचे आणि जिद्दीचे स्वागत केलं पाहिजे, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, येत्या 26 तारखेला दिल्लीत शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर मार्च काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने 10 वर्षे जुन्या ट्रॅक्टर्सवर बंदी घातली आहे. मात्र , आम्ही प्रजासत्ताक दिनी दिल्लीत जुने ट्रॅक्टर्स चालवून दाखवणार असल्याचं शेतकरी नेते राकेश टिकैत यांन सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘तुम्हाला मला काही द्यायचं असेल तर….’; रतन टाटांनी आपल्या कामगारांकडे व्यक्त केली ‘ही’ इच्छा

हिंदू महासभेने सुरू केलेली गोडसे ज्ञानशाळा दोन दिवसांतच बंद, प्रशासनाने ठोकले टाळे

सरपंचपदाचा लिलाव करणाऱ्या ‘या’ गावांना निवडणूक आयोगाचा झटका!

ड्रग्ज प्रकरणी नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून अटक!

‘एकदा सत्य बाहेर आलं की…’; धनंजय मुंडे प्रकरणावर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या