Top News

‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’; उद्धव ठाकरेचं मोदी सरकारवर टीकास्र!

मुंबई | अतिरेक्यांना सहानुभूती दाखवणाऱ्या पक्षाशी स्वखुशीने सोबत करायची आणि लफडे अंंगाशी येताच ‘मी नाही त्यातली कडी लावा आतली’ ही भूमिका घ्यायची अशी जोरदार टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आली आहे.

मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाबरोबरचा सत्ता रोमान्स हा एकप्रकारे स्वैराचार होता, या स्वैराचारातून त्यांनी एक सरकार जन्मास घातलं आणि त्यांचा गळा घोटून आम्ही त्या मुलाचे आईबापाच नव्हतो, असं काखा वर करून सांगू लागले, असं अग्रलेखात म्हटलंय.

म्हणजे पीडीपीसोबत तीन वर्षे ‘सत्ताशय्या’ भोगली, पण जे फळ निघालं त्याच्या पितृत्वांची जबाबदारी भाजपनं नाकारली, असंही त्यात सांगण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या –

-‘ते माझे ठुमकेच बघत असतील’- सपना चौधरी

-प्लास्टिकमुळे अधिकाऱ्यांनाच भरावा लागला दंड!

-….अखेर ‘त्या’ आंबटशौकीन अधिकाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

-…हे तर मोठे राजकीय षडयंत्र; छगन भुजबळ यांचा आरोप

-होय… मीच गौरी लंकेश यांना मारण्याची सुपारी घेतली!

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या