“नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक वाटतं ते मुर्खांच्या नंदनवनात फिरतायेत”
मुंबई | भष्ट्राचार हा सरकारी यंत्रणेचा भाग आहे, असं वक्तव्य राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी केलं होतं. असं वक्तव्य सरकारी अधिकाऱ्यांना शोभत नाही असं म्हणतं, अनेकांनी या वक्तव्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून हेमंत नगराळे यांच्या वक्तव्याचं समर्थन करण्यात आलं आहे.
नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक किंवा खळबळजनक वाटतं, ते मुर्खांच्या नंदनवनात फिरत आहे. निवडणूक ही भष्ट्राचाराची गंगोत्री आहे, असं बाळासाहेब म्हणायचे. हा भष्ट्राचार साफ करण्यासाठी एकच शेषन निर्माण झाला आहे. भष्ट्राचार हा जगण्याचा आणि यंत्रणेचाच भाग आहे. तुम्ही आम्ही काय करणार?, असा प्रश्न अग्रलेखातून विचारण्यात आला.
राज्याच्या पोलिस महासंचालकांनी सहजपणे केलेलं हे सत्यकथन आहे. नगराळे यांनी एकप्रकारे जनभावनाच व्यक्त केली आहे. अण्णांच्या आंदोलनात भाजपने बळ दिलं होतं. पण भाजपला देशात आणि राज्याराज्यात सत्तेत आल्यावर लोकपालाचा विसर पडला आहे. भाजपने देखील लोकपाल आणून भष्ट्राचाराला आळा घातला नाही, असं मत शिवसेनेनं अग्रलेखातून मांडलं आहे.
आम्ही भष्ट्राचाराचं समर्थन करत नाही. मात्र हा पूर्णपणे यंत्रणेचाच भाग बनला आहे. भष्ट्राचार हा सरकारी यंत्रणेतून खणून काढता येणार नाही. सरकारी यंत्रणेतून 100 टक्के दूर करता येणार नाही. भष्ट्राचार रोखण्यासाठी जो कायदा करण्यात आला आहे. तो भष्ट्राचाराला प्रतिबंध करा असं म्हणतो पण, भष्ट्राचाराचे मुळासकट उच्चाटन करा असं सांगत नाही, असं हेमंत नगराळे म्हणाले होते.
थोडक्यात बातम्या-
महिलेची संजय राऊतांविरोधात हायकोर्टात धाव; केले ‘हे’ गंभीर आरोप
‘माझा जुना मुर्ख बॉयफ्रेन्ड अजून…’; कंगणाची हृतिक रोशनवर बोचरी टीका
‘मुझे वो दिन आज भी याद है जब…’; युसूफने शेअर केला भावूक व्हिडिओ
खळबळजनक! पुण्यात पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
पठ्ठ्यानं पेट्रोल पंपावर भरलं डिझेल अन् केलं असं काही की…
Comments are closed.