बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”ही’ गोष्ट करून मोदींनी दाखवून दिलं, ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही'”

मुंबई | गुजरातमधील माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आपला दिलेला तडकाफडकी राजीनामा, त्यांच्याजागी अनपेक्षित असे भूपेंद्र पटेल यांची लागलेली वर्णी याची देशभर चर्चा आहे. मात्र ज्या आमदाराला एक मंत्रिपदही नाही आणि थेट मुख्यमंत्रिपद देणं हे अनेकांना रूचलं नाही. यावरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

आपण मोदींच्या जवळ आहोत आणि मोदींच्या मनात काय चाललं आहे हे फक्त आपल्यालाच कळतं असं अनेक पत्रकारांना वाटत होतं. ते मोदी ‘यालाच’ किंवा ‘त्यालाच’ मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची वर्णी लावून मोदींनी, मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही, असा संदेशच दिला असल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे.

पटेलांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे माध्यमांनी सांगितली होतीत. मात्र मोदींनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाला पसंती दिली. ज्याप्रकारे मोदी ‘मन की बात’ मध्ये कोणता विषय मांडणार याची सर्वांना आस लागलेली असते मात्र मोदी नेहमी नवीनच विषय शोधून काढतात तसच काहीसं गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोदींनी केलं.

दरम्यान, गुजरातमधील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण आक्रोश करीत आहेत व निवडणुकांत या संतापाचा फटका बसेल ही खात्री असल्यानेच मुख्यमंत्री रुपाणी यांना बदलून भूपेंद्र पटेल यांना नेमलं असल्याची टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘ …तर कोरोनाची लसही ठरु शकते निरुपयोगी’; WHOच्या माहितीनं जगाचं टेन्शन वाढलं!

राज्यभर गाजलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची अखेर ‘या’ जिल्ह्यात बदली!

“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?”

दरेकर, महिलांची माफी मागा नाहीतर गाल आणि थोबाड रंगवू- रुपाली चाकणकर

शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी- धनंजय मुंडे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More