नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समंथालाही मिळाला पार्टनर?, कोण आहे हा मिस्त्री मॅन?

Samantha | साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha) हिचा एक्स नवरा अभिनेता नागा चैतन्य याने 8 ऑगस्टरोजी प्रसिद्ध अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला. नागार्जुन यांनी मुलाच्या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले होते. हैदराबादमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नागा आणि सोभिता यांनी साखरपुडा उरकला आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोबतच्या नात्याला पूर्णविराम दिल्यानंतर नागा चैतन्य याने आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. तो दुसऱ्यांदा संसार थाटणार आहे. नागा याने समंथाशी 3 वर्षांपुर्वी घटस्फोट घेतला. नागाच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर नागाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. मात्र, समंथाचे (Samantha) चाहते नाराज झाले.

घटस्फोट होऊन तीनच वर्षे झाले, लगेच अभिनेत्याने दूसरा संसार थाटण्याचा निर्णय घेतल्याने समंथाचे चाहते संतापल्याचं सोशल मीडियावर दिसून आलं. अशात समंथाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. नागा याने आपला जोडीदार शोधला. नागा लवकरच लग्नही करणार आहे. तर, समंथा मात्र सध्या सिंगल आयुष्य जगत आहे. पण, अशात समंथा हीने देखील एक जोडीदार शोधला असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

समंथाला मिळाला नवा जोडीदार?

समंथाने (Samantha) आता आपल्या आयुष्यात मुव्ह ऑन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, ‘द फॅमिली मॅन’चा दिग्दर्शक राज (Raj Nidimoru) आणि समंथा प्रभू यांच्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. समंथा आणि राज या दोघांनी दोन ओटीटी प्रोजेक्टसाठी काम केले आहे.

यापूर्वी समंथाने ‘द फॅमिली मॅन 2’च्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केले होते. आता समंथा ही राज यांच्या ‘सिटाडेल: हनी बन्नी’मध्ये दिसणार आहे. त्यामुळे सध्या दोघांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगत आहे. पाहायला गेलं तर समंथा आणि राज यांनी याबाबत अधिकृत असं काहीच भाष्य केलं नाहीये.

नागा-समंथा यांचं नातं संपुष्टात

दरम्यान, समंथाने (Samantha) नागा चैतन्य याच्याशी 29 जानेवारी 2017 रोजी साखरपुडा केला होता. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले होते. दोघांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या काही वर्षांतच दोघं विभक्त झाले. समंथा आणि नागा चैतन्य यांनी ‘ये माया चेसावे’, ‘माझीली’, ऑटोनगर सूर्या’, ‘बेबी’ आणि’मनम’ मध्ये एकत्र काम केले होते.’ये माया चेसावे’ हा समंथा रुथ प्रभूचा डेब्यू चित्रपट होता.

News Title :  Samantha and Raj Nidimoru relationship talks

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ गोष्टींमुळेही वाढतो Heart Attack चा धोका; बातमी वाचून झोप उडेल

पुणेकरांसाठी अभिमानाची बाब! गुन्हे शाखेच्या पोलीस आयुक्तांना मिळणार विशिष्ट सेवा पोलीस पदक

श्रावणात चिकनपेक्षाही वांगी झाली महाग, इतर भाज्यांचेही दर कडाडले

राज्यातील पावसासंदर्भात काय आहे हवामान विभागाचा अंदाज!

सावधान! भारतातील मीठ आणि साखरेच्या अनेक ब्रँड्समध्ये आढळला ‘हा’ घातक पदार्थ