समंथाचा एक्स नवरा पुन्हा पडला प्रेमात; ‘या’ अभिनेत्रीशी थाटणार दुसरा संसार

Samantha Ruth Prabhu

Samantha | साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहत असते. समंथाने नागा चैतन्य याच्याशी 29 जानेवारी 2017 रोजी साखरपुडा केला होता. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले होते. दोघांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांतच दोघं विभक्त झाले.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ही सर्वांत चर्चेत असलेल्या जोडींपैकी एक होती. समंथाला (Samantha) घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य याचं नाव प्रसिद्ध अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत जोडलं गेलं. या दोघांच्या डेटिंगचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता हे दोघे साखरपुडा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला करणार साखरपुडा

एका मीडिया रिपोर्टनुसार, नागा चैतन्य आणि सोभिता आज 8 ऑगस्टरोजी साखरपुडा करणार आहेत. हैदराबादमध्येच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा होणार आहे. नागा चैतन्यचे वडील अभिनेते नागार्जुन त्यांच्या एंगेजमेंटनंतर दोघांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करू शकतात.मात्र, याबाबत अद्याप अभिनेता तसेच त्याच्या कुटुंबियांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.

नागाच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर नागाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. मात्र, अभिनेत्री समंथाचे (Samantha) चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर नाराजी जाहीर केली आहे. घटस्फोट होऊन तीनच वर्षे झाले, लगेच अभिनेत्याने दूसरा संसार थाटण्याचा निर्णय घेतल्याने समंथाचे चाहते संतापले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथा आणि नागा यांनी 2021 मध्ये घेतला घटस्फोट

समंथा आणि नागा चैतन्य यांनी ‘ये माया चेसावे’, ‘माझीली’, ऑटोनगर सूर्या’, ‘बेबी’ आणि’मनम’ मध्ये एकत्र काम केले होते.’ये माया चेसावे’ हा समंथा रुथ प्रभूचा डेब्यू चित्रपट होता. सध्या समंथा (Samantha) ही सिंगल आयुष्य जगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागा चैतन्य आणि सोभिता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा 2022 पासूनच होत्या. लंडनमधील एका रेस्टॉरंटमधील त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर जून महिन्यात त्यांच्या युरोपमधील व्हेकेशनचे फोटो देखील तूफान व्हायरल झाले होते.

News Title :  Samantha ex husband Naga Chaitanya To Get Engaged Today

महत्त्वाच्या बातम्या-

RBI चे नवीन पतधोरण जाहीर; तुमचा कर्जाचा EMI वाढणार की घटणार?

नागपंचमीच्या दिवशी ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, तुमच्या आयुष्यात येणार नाही संकट!

विनेश फोगाटला भारतरत्न आणि खासदारकी मिळणार? ‘या’ पक्षाने केली मागणी

या दोन राशींची होणार चांदी; गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ 2 राशींना मिळणार पैसाच पैसा

क्रिकेट विश्वातून खळबळजनक बातमी, युवा खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .