बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समांथा सामना करतेय ‘या’ गंभीर आजाराचा, चित्रपटाच्या शूटिंगमधूनही घेतला ब्रेक

मुंबई | दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभूनं (Samantha Ruth Prabhu)आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांची मनं जिंकली आहेत. तिचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहेत. परंतु समांथाला सध्या एका आजारानं ग्रासलं आहे. त्यामुळं समांथा लोकांमध्ये येणंही टाळत आहे.

समांथाला त्वचेशीसंबधित एक आजार झाला आहे. या आजाराचं नाव ‘पाॅलीमाॅर्फ्स लाइट इरप्शन’ असं आहे. या आजारामुळं सुर्यप्रकाशात आल्यानंतर त्वचेला खाज सुटते, वेदना होतात आणि चट्टेही पडतात.

समांथाला या आजाराने ग्रासल्यानं समांथा तिच्या शूटिंगमधून वेळ काढून उपचारासाठी अमेरिकेला गेली आहे. यामुळं तिनं तिच्या ‘खुशी’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखाही पुढं ढकलल्या आहेत.

या आजारामुळं समांथा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरही फारशी सक्रिय दिसत नाही. तसेच ती बऱ्याचदा कार्यक्रमांना जाणंही टाळत होती. दरम्यान, समांथा लवकरच बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘सारा, तारा, अनन्या आणि राधिका या…’, जान्हवी कपूरचं वक्तव्य चर्चेत

नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाचा सर्वात मोठा झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More