घटस्फोटाच्या 3 वर्षांनंतर समंथाचा मोठा खुलासा, म्हणाली…

Samantha Ruth Prabhu Fake Pictures viral 

Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. 2021 मध्ये दोघेही वेगळे झाले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

समंथाचा मोठा खुलासा

घटस्फोट झाल्यानंतर समंथा रुथ प्रभूनं (Samantha Ruth Prabhu) मध्यंतरी ती मायोसायटिस या ऑटो इम्युन विकाराशी लढा देत असल्याचा खुलासा केला होता. आपल्याला हा विकार झाल्याचं निदान झाल्याचं समंथाने ऑक्टोबर 2022 मध्ये जाहीर केलं होतं. पण या आजारावर मात करत सामंथाने जोरदार कमबॅक केलं. समंथा रुत प्रभू अलिकडेच वरुण धवनसोबत क्राईम-थ्रीवर सीटाडेल हनीबनी वेब सीरिजमध्ये झळकली आहे. या सीरीजच्या प्रमोशनवेळी समंथाने मोठा खुलासा केलाय.

अभिनेता नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्याच्या तीन वर्षांनंतर समंथाने पहिल्यांदाच आई होण्याबद्दलच्या तिच्या भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत. समंथाने यावेळी सांगितलं की, तिची आई होण्याची इच्छा आहे.

Samantha Ruth Prabhu  | “माझं आई होण्याचं स्वप्न आहे”

समंथा म्हणाली की, “मला वाटत नाही की, उशीर झाला आहे. माझं अजूनही आई होण्याचं स्वप्न आहे आणि हो, मला नक्कीच आई व्हायला आवडेल, मला नेहमीच आई व्हायची इच्छा होती. हा खूप सुंदर अनुभव आहे. मी त्याची वाट पाहत आहे. लोक सहसा वयाची काळजी घेतात, पण मला वाटतं की, आयुष्यात अशी वेळ आलेली नाही की, जेव्हा तुम्ही आई बनू शकत नाही.”

दरम्यान, समंथा रुथ प्रभू सध्या वरुण धवनसोबतच्या ‘सिटाडेल: हनी बनी’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ नंतर समंथा दुसऱ्यांदा ॲक्शन मोडमध्ये दिसल्याने प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘एक नाही तर तब्बल 8 वेळा सलमानसोबत रात्र…’; ‘या’ अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ

“निलंगा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे”

शरद पवारांचे फोटो वापरू नका, स्वतंत्र पक्ष म्हणून..; अजित पवारांना हायकोर्टाचे निर्देश

अजितदादांसाठी प्रसिद्ध अभिनेत्री प्रचाराच्या मैदानात; खास व्हिडिओ केला शेअर

“सरकार स्थापनेसाठी शरद पवार आणि भाजपात..”; अजित पवारांचा महागौप्यस्फोट

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .