एकीकडे एक्स नवऱ्याची हळद तर दुसरीकडे….; समंथा प्रभूवर दु:खाचा डोंगर

Samantha Ruth Prabhu | अभिनेत्री समंथा रुथ प्रभूवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. समंथाचे वडिल जोसेफ प्रभू यांचं निधन झालं आहे. या दुःखद बातमीने समांथा आणि तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

वडिलांच्या निधनानंतर समांथाने पोस्ट शेअर करत “पुन्हा भेट होईपर्यंत बाबा…” असं लिहित तुटलेल्या हृदयाचा इमोजी टाकला आहे. समांथाच्या आयुष्यात एकामागोमाग एक वाईट गोष्टी घडत चालल्या आहेत. एका वाईट घटनेतून सावरते ना सावरते तोच नवी वाईट घटना तिच्यासोबत घडत आहे.

समंथा प्रभूवर दु:खाचा डोंगर

समंथा (Samantha Ruth Prabhu) लहानपणापासूनच वडिलांच्या जवळ होती. तिच्या वडिलांनी अभिनेत्रीच्या संगोपन आणि जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सिने क्षेत्रातील कामं सांभाळत समांथ आपल्या कुटुंबियांसाठी वेळ देत होती.

ऑक्टोबर 2021 मध्ये, समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला होता. दरम्यान, यानंतर एक वर्षाने, समंथाचे वडील जोसेफ प्रभू यांनी फेसबुकवर लग्नाचे जुने फोटो पोस्ट केले. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, “हा घटस्फोट स्वीकारण्यासाठी मला बराच वेळ लागू शकतो”.

Samantha Ruth Prabhu च्या एक्स नवऱ्याची हळद

2021 मध्ये या समंथा आणि चैतन्यचा घटस्फोट झाला होता. आता नागा चैतन्य ‘मेड इन हेवन’ अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत पुन्हा लग्न करण्यास तयार आहे. 29 नोव्हेंबरला नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा हळदी समारंभ पार पडला.

नागा चैतन्य आणि समांथाचा घटस्फोट झाल्यानंतर दोघेही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले. त्यातच नागा चैतन्यने त्याच्या आयुष्याची नवी सुरुवात ही अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत केली.

Samantha and Raj Nidimoru relationship talks

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार?, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘या’ कारणामुळे राज्यातील थंडीचा जोर वाढणार

महिन्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा, सोनं ‘इतक्या’ हजारांनी झालं स्वस्त?

“आंबेडकरी समाज दुःखात बुडालेला असताना…”; शपथविधीबाबत ‘या’ नेत्याची मोठी मागणी

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; ‘त्या’ वक्तव्याने खळबळ