घटस्फोटानंतर समांथाच्या आयुष्यात नवी चाहूल? विवाहित दिग्दर्शकाशी जडले प्रेमसंबंध?

Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतर तब्बल चार वर्षांनी तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमुळे तिचं नाव विवाहित दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत जोडलं जात आहे. समांथाच्या ‘नवीन सुरुवात’ या सूचक कॅप्शनमुळे चाहत्यांमध्ये आणि नेटिझन्समध्ये ती खरंच प्रेमात आहे का, या चर्चांना उधाण आलं आहे.

राज निदिमोरू हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे. त्याचे श्यामली देशोबत लग्न झाले आहे, तर समांथाचा घटस्फोट अभिनेता नागा चैतन्यशी 2021 मध्ये झाला होता. दोघे अनेकदा एकत्र सार्वजनिक कार्यक्रमात दिसले आहेत, त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. (Samantha Ruth Prabhu)

प्रेम नाही, तर ‘शुभम’साठी व्यावसायिक नातं :

समांथाच्या या पोस्टमुळे भलेही प्रेमाच्या चर्चा रंगल्या असतील, पण वास्तविकता वेगळी आहे. समांथा आता निर्माती म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तिच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत तयार झालेला पहिला चित्रपट ‘शुभम’ 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने राज निदिमोरूसोबतचे फोटो शेअर केले होते.

“हा एक लांब प्रवास होता, पण आम्ही इथे आहोत. नवीन सुरुवात. #शुभम” असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते. या व्यावसायिक नात्यालाही चाहत्यांनी वैयक्तिक नात्याचे स्वरूप दिले आहे. विशेष म्हणजे, याआधी त्यांना चेन्नई सुपर चॅम्प्स या पिकलबॉल टीममध्ये एकत्र पाहिले गेले होते.

Samantha Ruth Prabhu | वैयक्तिक जीवनातून व्यावसायिक यशाकडे वाटचाल :

समांथा रूथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) घटस्फोटानंतर स्वतःला पुन्हा उभं केलं असून, अभिनयाबरोबरच आता ती निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवतेय. तिचा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे ती आजही लाखो चाहत्यांच्या हृदयात अधिराज्य गाजवते आहे.

राज आणि समांथा यांच्यातील नातं सध्या तरी फक्त व्यावसायिक आहे. मात्र, सोशल मीडियावर दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे अशा चर्चा पुढे काय वळण घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

News Title: After Divorce, Samantha Ruth Prabhu Sparks Dating Rumors with Married Director Raj Nidimoru — Here’s the Truth

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .