बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘… नाहीतर आम्ही एकमेकांचा जीव घेतला असता’, नागा चैत्यन्यसोबतच्या घटस्फोटावर समंथा स्पष्टच बोलली

मुंबई | कॉफी विथ करणचा (Koffee With Karan) सातवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) या लोकप्रिय शोमध्ये स्टार मंडळी नेहमीच हजेरी लावत असतात. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा (Samantha) आणि अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) हजेरी लावली. यावेळी समंथाने तिच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.

समंथा तिच्या आणि नागा चैतन्यच्या (Naga Chaitanya) घटस्फोटाबद्दलही शोमध्ये स्पष्ट बोलली. ती म्हणाली, अजूनही आमच्यातील वैर तसेच आहे. घटस्फोट होऊनही आमच्यात मैत्री होऊ शकली नाही. आम्ही जर एकाच घरात राहत असतो तर घरातील सगळ्या धारदार वस्तू लपवून ठेवाव्या लागल्या असत्या. अन्यथा नागा चैतन्य आणि मी एकमेकांचा जीवही घेऊ शकतो. यावरुन त्या दोघात अजूनही बिनसलेलं आहे हे लक्षात येतं.

शोमध्ये बोलत असताना करण जोहरने नागा चैत्यनचा चुकून तुझा पती असा उल्लेख केला तेव्हा समंथाने करणला थांबवत पूर्व पती म्हणायला लावले.  त्यानंतर करण जोहरने देखील लगेच पूर्व पती असा उल्लेख केला.

दरम्यान, समंथा म्हणाली मी पूर्वीपेक्षा खंबीर झाले आहे. या सर्वातून बाहेर पडले आहे. घटस्फोटाचा मार्ग मी स्वत: निवडला आहे. मला चाहत्यांसोबत मनमोकळेपणाने राहायचं आहे. मी एक अभिनेत्री म्हणून माझ्या आयुष्यात चाहत्यांचे खूप योगदान आहे.त्यामुळे चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याची माझी जबाबदारी आहे. आम्ही दोघे वेगळे झालो यापेक्षा दु:खद काहीच नाही, असेही समंथा करणने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत म्हणाली.

थोडक्यात बातम्या-

जम्बो कोविड सेंटरबाबत पालिका प्रशासनाचा मोठा निर्णय

‘…त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायची का?’, सुहास कांदेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

मॅगझीनसाठी रणवीर सिंग झाला विवस्त्र, न्यूड फोटोज सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो

अंबादास दानवेंच्या ‘त्या’ दाव्यानंतर एकनाथ शिंदेंचा खळबळजनक खुलासा, म्हणाले…

राष्ट्रपती झाल्यानंतर दौपदी मुर्मूंना मिळणार ‘इतका’ पगार; बंगला आणि गाड्यांसह सुरक्षाही सर्वोच्च

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More