कोर्टाच्या आदेशापुढे संभाजी भिडे नमले; अखेर नाशिक न्यायालयात हजेरी

नाशिक | माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असा अजब दावा करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी अखेर कोर्टात हजेरी लावली आहे. नाशिकच्या कोर्टाने यासंदर्भात आदेश काढले होते. 

संभाजी भिडे हे कोर्टात हजेरीसाठी येणार असल्याने कोर्टाच्या परिसरात नाशिक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटण्यासाठी कोर्टाच्या परिसरात मोठी गर्दी केली आहे.

आंबा प्रकरणात नाशिक महापालिकेने भिडेंविरोधात तक्रार केली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. 

याआधीच्या तारखांना भिडे न्यायालयात गेले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-होय, भाजपने गरज पडेल तसा माझा वापर करुन घेतला- एकनाथ खडसे

-जगाला हेवा वाटावा असा विक्रम पाकिस्तानी गोलंदाजाच्या नावावर!

-‘वसुंधरा राजे खूप जाड झाल्या आहेत, त्यांना आराम द्या’ वक्तव्यावर शरद यादवांच स्पष्टीकरण

-मलाही लग्न करुन सुखी संसार थाटायचा होता, पण… – कतरिना कैफ

-भाजपला मोठा झटका; मोदी सरकारमधील हा मंत्री काँग्रेससोबत जाणार???