Loading...

लवासावर संभाजी भिडे यांचे गंभीर आरोप

कोल्हापूर | लवासामुळे निसर्गाचा मुडदा पडला, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. सांगली-कोल्हापूरच्या पुरस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलते झाले.

2005 ला आलेल्या पुराच्या तुलनेत सध्याच्या पुराची स्थितीही 100 पटीने भीषण आहे. फक्त लवासाच नाही तर गावोगावी निसर्गाचा असा मुडदा पडत आहे, असंही संभाजी भिडे यावेळी म्हणाले.

Loading...

शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते पुरग्रस्तांना मदत करत आहेत. प्रशासनही पूरपरिस्थिती सावरण्यासाठी योग्य दिशेने पावलं टाकत आहे. या गंभीर परिस्थितीत जसं सगळ्यांनी एकत्र येत संकटाचा सामना केला तसंच येत्या काळात येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी आपण एकजुटीने राहणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, आता सगळं आईच्या मायेनं सावरायला हवं, असं म्हणताना भिडे भावूक झाले.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-आमदार महेश लांडगेंच्या ‘एक हात मदतीचा’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद!

-राज्यासाठी 6800 कोटी रूपयांची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार- मुख्यमंत्री फडणवीस

-मुख्यमंत्री सहायता निधीसाठी राष्ट्रवादीकडून 50 लाखांची मदत

Loading...

-मुख्यमंत्र्यांसहित सर्व मंत्री पूरग्रस्तांना देणार एका महिन्याचा पगार

-“प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातांपेक्षा मदतीसाठी सरसावलेला 1 हात कधीही महत्वाचा”

Loading...