बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॉक्टर नालायक लुटारू आहेत, त्यांच्याकडे जाऊ नका”

अमरावती | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल अपशब्द वापरत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संभाजी भिडे यांनी अमरावतीत एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी पत्रकारांशी बोलताना संभाजी भिडे यांनी डॉक्टरांबद्दल अपशब्द वापरत राग व्यक्त केला आहे. डॉक्टर मारखाण्याच्या लायकीचे आहेच, असं खळबळजनक वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

जेवढा शिकलेला माणूस तेवढा गाढव आहे. डॉक्टर लोक हे नालायक आहेत, ते लुटारू आहेत. ते हरामखोर आहेत, ते मारायच्या लायकीचे आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. तर डॉक्टर रूग्णांना लुटतात, त्यांच्याकडे कधी जाऊ नका. हे डॉक्टर मारखाण्याच्या लायकीचे आहेत, असंही संभाजी भिडे म्हणाले.

दरम्यान, भिडे यांनी कार्यक्रमात मास्क घालून बसणाऱ्यालाही मास्क काढायला सांगितला. तू मराठी माणूस आहे XXडू नाही. कोरोना थोतांड आहे, डॉक्टर नालायक आहेत. कोरोना काळात या डॉक्टरांनी लोकांना लुटलं. डॉक्टरांकडे कधी जाऊ नका, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला यश, ठाकरे सरकारने मान्य केल्या ‘या’ मागण्या

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; पंढरपुरात महावितरणला साप भेट

“ह्रदयाचे ठोके वाढले आहेत, आशा आहे की..”; अमिताभ बच्चन यांचं ट्विट चर्चेत

राष्ट्रवादीला मोठा धक्का! ‘या’ नेत्याची 13 कोटी 41 लाखांची मालमत्ता जप्त

मोठी बातमी! तीन दिवसांनंतर छत्रपती संभाजीराजेंचं उपोषण मागे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More