‘आंबा’ प्रकरणात संभाजी भिडेंना दिलासा; 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर

नाशिक | आंबा प्रकरणात श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्तानच्या संभाजी भिडे यांना दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. 

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यानं तर मुलं होतात, असा दावा त्यांनी केला होता. 

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर नाशिक महापालिकेनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.   

या प्रकरणाची आज नाशिकच्या न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने संभाजी भिडे यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. 

महत्वाच्या बातम्या-