बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भिडे गुरुजींनी सरसंघचालक मोहन भागवतांना अपशब्द वापरले का?; संजय राऊतांच्या फॅनपेजवरुन सवाल

मुंबई | लॉकडाऊन विरोधात लोकांनी बंड करायला पाहिजे आणि असे नियम लादणाऱ्या शासनाला फेकून द्यायला पाहिजे. कोरोना हा रोगच नाहिये हा गांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे, असं अजब आणि वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. यावरून आता संजय राऊत यांच फॅनपेज असलेल्या एका पेजवरून संभाजी भिडे यांच्यावर टीका करत मोहन भागवतांना टोला लगावण्यात आला आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर भागवत यांनी टेस्ट करून घेतली. त्यात त्यांची टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. त्यानंतर संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याशी मोहन भागवत यांचा संदर्भ जोडण्यात येत आहे. ‘सो दाऊद एक राऊत’  हे संजय राऊत यांच फॅनपेज आहे. या पेजवर भिडे गुरूजी सरसंघचालकांना गांडू म्हणाले का?, असा खोचक सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

कोरोना हा मुळ रोगच नाही आणि कोरोनामुळे मरणारे लोक हे जगण्याच्या लायकीचे नाहीत, संभाजी भिडे यांनी कोरोना संदर्भात अजब वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संभाजी भिडे यांची खिल्ली उडवली होती. तर नागरिकांना भडकवल्या प्रकरणी भिडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील करण्यात आली होती.

पंढरपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर बोलताना हे वक्तव्य म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धिचा प्रकार असल्याचं म्हटलं होतं. अजित पवार यांनी आपण योग्य तो कारवाईचा निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता भिडे यांच्यावर राज्य सरकार कारवाईचा बडगा उचलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा पोस्ट-

थोडक्यात बातम्या-

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण!

खळबळजनक! आणखी एका रूग्णालयातील 35 डॉक्टरांना लस घेतल्यानंतरही झाली कोरोनाची लागण

आरोपांकडे लक्ष देऊ नका, कामावर भर द्या- नरेंद्र मोदी

नागपूरच्या वेल ट्रीट कोरोना रुग्णालयाला आग; 4 जणांचा मृत्यू

” उद्धव ठाकरेंना 40 दिवसांमध्ये मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More