बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना गेला खड्ड्यात! संभाजी भिडेंनी आमदारालाच काढायला लावला मास्क!

सांगली | राज्यात कोरानाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला एका आठवड्याचा अल्टीमेटम दिला आहे. अशात राज्यात विविध ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पडत आहेत. अशाच एका उद्घाटन कार्यक्रमामुळे संभाजी भिडे चर्चेत आले आहेत.

वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे पुन्हा चर्चेत आले आहेत. सांगली जिल्ह्यातील आळसंद गावातील एका दुकानाच्या उद्घाटनात संभाजी भिडे यांनी सरळ आमदारांना तोंडावरचा मास्क काढायला लावला. या दुकानाच्या उद्घाटनाला खानापुर आटपाडीचे आमदार अनिल बाबर उपस्थित होते.

बाबरांच्या हस्ते या दुकानाचं उद्घाटन झालं. यावेळी भिडेंनी बाबरांना ‘मास्क काढा आणि मग उद्घाटन करा’ असा फर्मान सुनावला. आमदारांनीही हा आदेश मान्य करत मास्क उतरवला. यावेळी उपस्थितीत असलेल्य बऱ्याच जणांनी मास्क लावले नव्हते.

दरम्यान, चौकाचौकात पोलिस सामान्य नागरिकांकडून नियमांचं पालन करून घेत आहेत. तर दुसरीकडे आमदार आणि नेत्यांना वेगळा नियम आहे का?, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मी मर्द आहे हे उद्धव ठाकरेंनी परत कधीही म्हणू नये”

संजय राठोडांसाठी जमलेल्या गर्दीत कोरोना; महंत कबीरदास यांच्यासह 19 जण पाॅझिटिव्ह

‘कोरोनापासून बचावासाठी मी रोज…’; ‘या’ भाजप नेत्याचं अजब वक्तव्य

मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत- संजय राऊत

…म्हणून हृतिक रोशनने 75 कोटींची ती ऑफर धुडकावली!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More