Top News

भिडेंना पाठवलेली नोटीस परत आली; आता भिडेवर कायदेशीर कारवाई होणार!

नाशिक | वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडेंना पाठवलेली नोटीस त्यांनी स्वीकारली नसून ही नोटीस परत आली आहे. याप्रकरणी भिडेंविरोधात आता कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी सांगितलं आहे. 

माझ्या शेतातील आंबे खाल्ल्यास मुलं होतात. 180 जणांना आंबे दिले त्यापैकी 150 जणांना मुले झाली. ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होतो, असं वक्तव्य असलेला संभाजी भिडेंचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. 

सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी तक्रार दाखल केली होती. गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याअंतर्गत संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात इंग्लंडचा विजय

-संभाजी भिडेंनी आम्हाला शब्द दिलाय; शिवसेनेचा दावा

-मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाटण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा डाव फसला, गुन्हे दाखल

-ख्रिश्चनांच्या देशप्रेमाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी कराल तर आता मार पडेल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या