संभाजी भिडे भडकले; म्हणाले, “288 आमदार बिनकामाचे”

सांगली | राज्यातील 288 आमदार बिनकामाचे आहेत, असं वक्तव्य श्रीशिवप्रतिष्ठान हिंदूस्तानचे संभाजी भिडे यांनी केलंय. ते तासगावमध्ये गडकोट मोहिमेसाठी घेतलेल्या धारकऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. 

प्रतापगडाच्या कुशीत शिवरायांचे स्मारक व्हावे यासाठी कुणीच प्रयत्न करत नाही. शिवाजी महाराजांच्या नावाचा राज्यकर्त्यांनी आजपर्यंत फक्त वापर केला, असा आरोप संभाजी भिडे यांनी केला.

भाजप खासदार संजय पाटील मराठा आहेत. मात्र शिवरायांचे स्मारक व्हावे अशी मागणी त्यांनी केव्हाच केली नाही किंवा मी उपोषणाला बसेन असं ते केव्हाच म्हणाले नाहीत, असंही संभाजी भिडे म्हणाले.