यमाला अध्यक्ष करुन यंत्रणा नेमा, मी चौकशीला तयार!

सांगली | माझ्यावरील आरोप निराधार आहेत. मी कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे, असं संभाजी भिडे यांनी सांगितलं. याप्रकरणी प्रथमच माध्यमांसमोर येऊन त्यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे, हिंदु एकता मंचचे मिलिंद एकबोटे यांच्यावर कोरेगाव भीमा गावातील हिंसाचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. काल त्यांनी याप्रकरणी प्रसिद्धीपत्रक काढून आपली बाजू मांडली होती. 

दरम्यान, अगदी यमाला अध्यक्ष करुन एखादी यंत्रणा नेमावी, त्या चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे. आम्ही दंगल पेटवली हे, अमावस्येच्या दिवशी रात्री 12 वाजता सूर्य पाहिला, याच्याइतकं सत्य असल्याचं त्यांनी सांगितलं.