मुंबई | मनुस्मृतीचा अभ्यास करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली, असा दावा श्रीशिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी केला आहे. ते न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनूचं कौतुक केलं होतं. राजस्थान विधानसभेबाहेर मनूचा पुतळा उभा करण्यासाठी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेब गेले होते. मनूचा जो पुतळा उभा करण्यात आला होता, त्या पुतळ्याखाली ‘मनू हा जगातला पहिला कायदेपंडित होता’ असं स्वतः बाबासाहेब यांनी लिहिलं होतं, असा दावा भिडेंनी केला आहे.
दरम्यान, आंबा खाल्ल्याने पुत्रप्राप्ती होते या वक्तव्यानंतर त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-होय… भूगोलाच्या पुस्तकात गुजराती मजकूर छापण्यात आला, संबंधितांवर कारवाई करणार!
-…तर येत्या निवडणुकीत महादेव जानकराचं डिपाॅझिट जप्त करू!
-जानकरांच्या तालुक्यातही दूध आंदोलन तीव्र; जानकरांचा पुतळा जाळला!
-नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज; सुरक्षा यंत्रणांची एकच धावाधाव
-शेतकऱ्याला जगवणाऱ्या दुधाच्या धंद्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही- अजित पवार