पुणे | श्रीशिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मनुस्मृती लिहिणारा मनू संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या एक पाऊल पुढे होता, असं त्यांनी म्हटलंय.
मनाला दास बनवण्याची जी कृती आहे, जो आचार आहे तो म्हणजे धर्माचार. तो धर्माचार साध्य कसा होईल? ते ज्ञानोबा-तुकोबा, संत, तपस्वींनी शिकवलं. आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार यांच्यातून प्राप्त होते पण मनू त्यांच्या एक पाऊल पुढे आहे, असं ते म्हणाले.
संभाजी भिडे यापूर्वीही वादग्रस्त वक्तवे करुन वादात सापडले आहेत. आता मनुस्मृतीचा निर्माता मनूसोबत ज्ञानोबा-तुकोबांची तुलना केल्यानं मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
पाहा व्हीडिओ-
महत्त्वाच्या बातम्या–
-…म्हणून अमित शहा आज बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेणार
-राष्ट्रवादीला मोठा धक्का; 5 बडे मासे भाजपच्या गळाला!
-भाजपची खेळी; महादेव जानकरांवर माघार घेण्याची नामुष्की?
-आम्ही कायदा हातात घेतलाय, सरकारला काय करायचं ते करू दे- राजू शेट्टी
-पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ पुन्हा सुरु; सलग तिसऱ्या दिवशी भाव वाढले!
Comments are closed.