बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्र, राज्य आणि कर्नाटकातही भाजपचंच सरकार, पण तरीही पाणी सोडलं नाही”

सांगली | केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही भाजपचंच सरकार आहे, तरीही सरकारने अलमट्टी धरणातून पाणी सोडलं नाही हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सरकारवर टीका केली आहे.

सांगली- कोल्हापूर भागातल्या पूरस्थितीचा आढावा त्यांनी घेतला, त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. प्रशासनाला पूर्णपणे दोष देता येणार नाही. राज्यकर्ते नीट वागत नाहीत, म्हणून अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. त्यामुळे राज्यकर्ते निवडून देताना विचार करण्याची गरज असल्याचंही संभाजी भिडेंनी म्हटलं आहे.

शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांना जेवढी मदत करणं शक्य होतं तेवढी त्यांनी केली. आता सगळे धारकरी मिळून गाव स्वच्छ ठेवण्याचा विडा आम्ही उचलणार आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, राजाराम बापू पाटील यांनी जी संकल्पना त्या काळी राज्य सरकार समोर मांडली होती ती त्याचवेळी आमलात आणली असती तर हे संकट राज्यावर आलं नसतं, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-वंचितचं निवडणूक चिन्ह ठरलं; कुणाला ठेवणार ‘ग‌ॅस’वर??

-प्रतीक्षा संपली…! बहुचर्चित ‘पळशीची पीटी’ सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

-“पुलवामासारख्या घटनांचा जाब विचारला तर गद्दार ठरवलं जातं”

-कलम 370 हटवणं लोकशाहीविरोधी निर्णय- प्रियांका गांधी

-‘हिंदू पाकिस्तान’ शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टाचं अटक वॉरंट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More